Skip to main content

मिशन इंद्रधनुष


मिशन इंद्रधनुष

मिशन इंद्रधनुष ही मोहीम जे. पी. नड्डा या भारताच्या आरोग्य मंत्र्यांनी २५ डिसेंबर २०१४ रोजी विमोचित केली.[१]या योजनेचा उद्देश २ वर्षांखालील लहानग्यांचा व त्यांच्या मातांचा, सन २०२० पर्यंत, सात प्रकारच्या रोगांपासून लसीकरणाच्या माध्यमातून बचाव करणे असा आहे. 

या रोगांमध्ये खालील रोगांचा अंतर्भाव होतो: 

👉घटसर्प (डिप्थेरिया), 

👉डांग्या खोकला (हूपिंग कफ),

👉 धनुर्वात (टिटॅनस), 

👉पोलिओ

👉क्षयरोग

👉देवी व

👉 कावीळ-ब (हेपाटायटिस-बी) [२] 

तसेच काही निवडक राज्यांमध्ये 

👉हिमोफेलिया व 

👉इन्फ्लुएंझा (प्रकार ब) याही लसी पुरविल्या जातील.[३][४][५]

संपूर्ण लसीकरण म्हणजे किमान ९०% लसीकरणाची पातळी गाठणे अपेक्षित आहे . २००९ मध्ये हे प्रमाण ६१% होते २०१३ मध्ये ते ६५% असून २०२० अखेर ते ९०% करावयाचे आहे . वरील सात प्रकारच्या आजारावरील लस या मोफत मिळताहेत . योजनेच्या पहिल्या टप्प्यात २०१ जिल्हे निवडले होते . हा टप्पा जानेवारी २०१५ ते जून २०१५ असा होता , तो ऑगस्ट २०१५ पर्यंत राबविण्यात आला . ७ ऑक्टोबर २०१५ ला योजनेचा दुसरा टप्पा सुरु झाला . शासन या योजनेत ७ लसींबरोबर आणखी ४ लसी वाढविण्याच्या विचारात आहे , या लसी -सुधारित पोलिओ ,जापानीज मेंदूज्वर ,रोटाव्हायरस लस , गोवर -रुबेला लस असतील .

संदर्भसंपादन करा


Comments