Posts

मिशन इंद्रधनुष

मिशन इंद्रधनुष मिशन इंद्रधनुष  ही मोहीम  जे. पी. नड्डा  या भारताच्या आरोग्य मंत्र्यांनी २५ डिसेंबर २०१४ रोजी विमोचित केली. [१] या योजनेचा उद्देश २ वर्षांखालील लहानग्यांचा व त्यांच्या मातांचा, सन २०२० पर्यंत, सात प्रकारच्या रोगांपासून लसीकरणाच्या माध्यमातून बचाव करणे असा आहे.  या रोगांमध्ये खालील रोगांचा अंतर्भाव होतो:  👉घटसर्प (डिप्थेरिया),  👉डांग्या खोकला (हूपिंग कफ), 👉 धनुर्वात (टिटॅनस),  👉 पोलिओ ,  👉 क्षयरोग ,  👉देवी व 👉 कावीळ-ब (हेपाटायटिस-बी)  [२]   तसेच काही निवडक राज्यांमध्ये  👉हिमोफेलिया व  👉इन्फ्लुएंझा (प्रकार ब) याही लसी पुरविल्या जातील. [३] [४] [५] संपूर्ण लसीकरण म्हणजे किमान ९०% लसीकरणाची पातळी गाठणे अपेक्षित आहे . २००९ मध्ये हे प्रमाण ६१% होते २०१३ मध्ये ते ६५% असून २०२० अखेर ते ९०% करावयाचे आहे . वरील सात प्रकारच्या आजारावरील लस या मोफत मिळताहेत . योजनेच्या पहिल्या टप्प्यात २०१ जिल्हे निवडले होते . हा टप्पा जानेवारी २०१५ ते जून २०१५ असा होता , तो ऑगस्ट २०१५ पर्यंत राबविण्यात आला . ७ ऑक्टोबर २०१५ ला य...

सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम

सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम भारत सरकारने १९८५ मध्ये सुरू केलेला लसीकरण कार्यक्रम वैश्विक लसीकरण कार्यक्रम  हा  भारत सरकारने  १९८५ मध्ये सुरू केलेला लसीकरण कार्यक्रम आहे. १९९२ मध्ये हा बाल अस्तित्व आणि सुरक्षित मातृत्व कार्यक्रमाचा एक भाग बनला आणि २००५ पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) हा एक महत्त्वाचा भाग आहे. [१]  यालाच  सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम  किंवा  नियमित लसीकरण कार्यक्रम  असेही म्हणतात. समाविष्ट असलेल्या लसी संपादन करा या कार्यक्रमात आता  👉 क्षयरोग ,  👉डिप्थीरिया,  👉 डांग्या खोकला ,  👉 धनुर्वात ,  👉 पोलिओमायलाईटिस ,  👉 गोवर ,  👉 हिपॅटायटीस बी ,  👉 अतिसार ,  👉जपानी एन्सेफलायटीस,  👉रुबेला,  👉 न्यूमोनिया (हिमोफिलस इन्फ्लुएंझा टाइप बी) आणि  👉न्यूमोकोकल रोग (न्यूमोकोकल आणि न्युमोनिया आणि मेंदूज्वराचे लसीकरण) समाविष्ट आहे.  👉हिपॅटायटीस बी आणि  👉न्यूमोकोकल रोग अनुक्रमे २००७ आणि २०१७ मध्ये जोडले गेले. ♨️यूआयपीमध्ये समावेश झालेल्या इतर रोगांच...

हिपॅटायटीस ए लस

हिपॅटायटीस ए लस हिपॅटायटीस ए लस  ही एक अशी लस आहे जी हिपॅटायटीस ए प्रतिबंधित करते. [१]  ही सुमारे 95% प्रकरणांमध्ये प्रभावी आहे आणि कमीतकमी पंधरा वर्षे आणि शक्यतो एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यभरासाठी टिकते. [१] [२]  जर डोस दिले तर, एक वर्ष वयानंतर दोन डोस देण्याची शिफारस केली जाते. हे स्नायूमध्ये इंजेक्शनद्वारे दिले जाते. [१] जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) अशा रोगांसाठी मध्यमपणे सामान्य असणार्‍या भागामध्ये सार्वत्रिक लसीकरण करण्याची शिफारस करते. जेथे हा आजार खूपच सामान्य आहे, तेथे व्यापक लसीकरण करण्याची शिफारस केली जात नाही कारण साधारणपणे लहान असतानाच संसर्गाद्वारे सर्व लोक प्रतिकारशक्ती विकसित करतात. [१]  रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रे (सीडीसी) जास्त जोखीम असलेल्या प्रौढ लोकांना आणि सर्व मुलांना लसीकरण करण्याची शिफारस करतात. [३] तीव्र आनुषंगिक परिणाम फारच दुर्मिळ आहेत. इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना सुमारे 15% मुले आणि अर्ध्या प्रौढांमध्ये होते. बहुतांश हिपॅटायटीस ए लसींमध्ये निष्क्रिय व्हायरस असतो तर काहींमध्ये विषाणू कमकुवत असतो. गरोदरपणात किंवा दुर्बल प्रतिका...

गोवर लस

गोवर लस गोवर लस  ही अशी लस आहे जी गोवर प्रतिबंधित करते. [१] एका डोसनंतर प्रतिकारशक्ती विकसित होत नाही अशा जवळजवळ सर्वच जणांना दुसर्‍या डोस नंतर विकसित होते. जेव्हा लोकसंख्येमध्ये लसीकरणाचा दर 92% पेक्षा जास्त असतो तेव्हा गोवरचा उद्रेक दिसून येत नाही; तथापि, लसीकरणाचा दर कमी झाल्यास तो पुन्हा येऊ शकतो. [२] लसचा प्रभाव बरीच वर्षे टिकतो. कालांतराने ती कमी प्रभावी झाल्याचे स्पष्ट झालेले नाही. गोवरचा प्रादुर्भाव झाल्यानंतर दोन दिवसांत लस दिली असल्यास गोवरपासून संरक्षण सुद्धा होऊ शकते. [१] लस दोन्हीप्रकारे म्हणजे प्रत्यक्ष लस आणि एमएमआर लस अशा संयोजनामध्येही (रुबेला लस आणि गालगुंड लस यांचे एक संयोजन) उपलब्ध आहे किंवा MMRV लस (एमएमआर आणि कांजिण्याची लस यांचे एक संयोजन). गोवरची लस सर्व पातळीवरील गोवर प्रतिबंधित करण्यासाठी तितकीच प्रभावी आहे, परंतु संयोजनानुसार त्याचे आंनुषंगिक परिणाम बदलतात. जागतिक आरोग्य संघटनेने अशी शिफारस केली आहे की जगातील ज्या भागात हा रोग सामान्य आहे अशा ठिकाणी वयाच्या नवव्या महिन्यामध्ये किंवा जेथे हा रोग सामान्य नाही तेथे वयाच्या बाराव्या महिन्यामध्ये दिली जावी. गो...

पर्ट्यूसिस लस

पर्ट्यूसिस लस पर्ट्यूसिस लस  ही लस ही डांग्या खोकल्यापासून (पर्ट्यूसिस) संरक्षण करते. [१]  दोन मुख्य प्रकार आहेत: संपूर्ण पेशीच्या लसी आणि पेशी नसलेल्या लसी. संपूर्ण पेशी लस सुमारे 78% प्रभावी आहे तर पेशी नसलेली लस 71-85% प्रभावी आहे. [२]  लसीकरणानंतर लसींची परिणामकारकता दर वर्षी 2 ते 10% पर्यंत कमी झाल्याचे दिसून येते तसेच संपूर्ण पेशी लसींद्वारे ती अधिक झपाट्याने कमी झाल्याचे दिसून येते. गर्भधारणेदरम्यान आईचे लसीकरण केल्यास बाळाचे संरक्षण होऊ शकते. 2002 मध्ये या लसीमुळे 500,000 हून अधिक जीव वाचले असा अंदाज आहे. [३] वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ॲंड प्रिव्हेंशन यांनी सर्व मुलांना पर्ट्यूसिसची लस देण्याची आणि त्यास नियमित लसींमध्ये समाविष्ट केले जाण्याची शिफारस केली आहे. [१] [४]  यात एचआयव्ही / एड्स असणार्‍या लोकांचा समावेश आहे. वयाच्या सहा आठवड्यापासून सुरू होणार्‍या तीन डोसची शिफारस विशेषत: लहान मुलांमध्ये केली आहे. मोठ्या मुलांना आणि प्रौढांना अतिरिक्त डोस दिले जाऊ शकतात. लस केवळ धनुर्वात आणि घटसर्प यासाठीच्या लसींच्या संयोजनात उपलब्ध आहे. [...

मेनिंगोकोकल लस

मेनिंगोकोकल लस मेनिंगोकोकल लस  ही  नायशेरिया मेनिन्जायटीसच्या कोणत्याही संसर्गाला प्रतिबंधित करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या कोणत्याही लसींसाठी संदर्भित केली जाते. [१] मेनिन्गोकोकसच्या काही किंवा सर्व प्रकारांविरूद्ध भिन्न आवृत्त्या प्रभावी आहेत: ए, बी, सी, डब्ल्यू -135 आणि वाय. या लसी किमान दोन वर्षांसाठी 85 ते 100% प्रभावी आहेत. त्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जात असलेल्या लोकांमध्ये मेनिन्जायटीस आणि सेप्सिस कमी होण्यास कारणीभूत असतात. [२] [३]  ते एकतर स्नायूमध्ये इंजेक्शनद्वारे किंवा त्वचेच्या खाली दिले जातात. जागतिक आरोग्य संघटनेने अशी शिफारस केली आहे की मध्यम किंवा जास्त प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव असणार्‍या किंवा जेथे वारंवार उद्रेक होतो अशा देशांनी नियमितपणे लसीकरण करावे. [१] [४]  रोगाची जोखीम कमी असलेल्या देशांमध्ये, उच्च जोखीम गटांना लसीकरण करण्याची त्यांनी शिफारस केली आहे. [१]  आफ्रिकन मेनिन्जायटीस बेल्टमध्ये एक ते तीस वर्ष वयोगटातील सर्व लोकांना मेनिन्जोकॉकल ए संयुग्मक लसीच्या द्वारे लसीकरण करण्याचे प्रयत्न चालू आहेत. [४]  कॅनडा आणि अमेरिकेत चारही प...

हिपॅटायटीस बी लस

हिपॅटायटीस बी लस हिपॅटायटीस बी  ही एक अशी लस आहे जी हिपॅटायटीस बी प्रतिबंधित करते. [१]  पहिला डोस जन्मानंतर 24 तासांच्या आत देण्याची आणि त्यानंतर दोन किंवा तीन डोस देण्याची शिफारस केली जाते. यात एचआयव्ही / एड्स यांसारख्या कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्या आणि अकाली जन्मलेल्यांचा समावेश आहे. आरोग्यसेवा कर्मचार्‍यांना देखील लस देण्याची शिफारस केली जाते. निरोगी लोकांमध्ये नियमित लसीकरणामुळे 95% पेक्षा जास्त लोक संरक्षित असतात. [१] जास्त जोखीम असलेल्यांमध्ये लसीने योग्य कार्य केलेले आहे हे पाहण्यासाठी रक्त तपासणी करण्याची शिफारस केली जाते. प्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या लोकांना अतिरिक्त डोसची आवश्यकता असू शकते परंतु बहुतांश लोकांसाठी त्याची आवश्यकता नसते. ज्यांना हिपॅटायटीस बी विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग झाला आहे परंतु लसीकरण झाले नाही अशा लोकांमध्ये लस देण्याव्यतिरिक्त हिपॅटायटीस बी रोगप्रतिकारक ग्लोब्युलिन द्यावे. लस ही स्नायूमध्ये इंजेक्शनद्वारे दिली जाते. [१] हिपॅटायटीस बीच्या लसीपासून होणारे गंभीर आनुषंगिक परिणाम अतिशय असामान्य आहेत. इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना होऊ शकते. ही गर्भधा...