मिशन इंद्रधनुष
मिशन इंद्रधनुष मिशन इंद्रधनुष ही मोहीम जे. पी. नड्डा या भारताच्या आरोग्य मंत्र्यांनी २५ डिसेंबर २०१४ रोजी विमोचित केली. [१] या योजनेचा उद्देश २ वर्षांखालील लहानग्यांचा व त्यांच्या मातांचा, सन २०२० पर्यंत, सात प्रकारच्या रोगांपासून लसीकरणाच्या माध्यमातून बचाव करणे असा आहे. या रोगांमध्ये खालील रोगांचा अंतर्भाव होतो: 👉घटसर्प (डिप्थेरिया), 👉डांग्या खोकला (हूपिंग कफ), 👉 धनुर्वात (टिटॅनस), 👉 पोलिओ , 👉 क्षयरोग , 👉देवी व 👉 कावीळ-ब (हेपाटायटिस-बी) [२] तसेच काही निवडक राज्यांमध्ये 👉हिमोफेलिया व 👉इन्फ्लुएंझा (प्रकार ब) याही लसी पुरविल्या जातील. [३] [४] [५] संपूर्ण लसीकरण म्हणजे किमान ९०% लसीकरणाची पातळी गाठणे अपेक्षित आहे . २००९ मध्ये हे प्रमाण ६१% होते २०१३ मध्ये ते ६५% असून २०२० अखेर ते ९०% करावयाचे आहे . वरील सात प्रकारच्या आजारावरील लस या मोफत मिळताहेत . योजनेच्या पहिल्या टप्प्यात २०१ जिल्हे निवडले होते . हा टप्पा जानेवारी २०१५ ते जून २०१५ असा होता , तो ऑगस्ट २०१५ पर्यंत राबविण्यात आला . ७ ऑक्टोबर २०१५ ला य...